विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आता महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे घडणाऱ्या हालचालींना वेग चढला आहे. येणाऱ्या निवडणुकीत महायुतीत कोणता पक्ष किती जागा लढवणार यावरून आता राजकारणाची चिन्ह बदलू लागले असल्याचे दिसत आहे. काही पक्षांनी यापूर्वीच अगदी उघडपणे किती जागा हव्यात हे बोलून दाखवलेला आहे तर दुसरीकडे भाजप पक्ष सर्वात जास्त जागांवर निवडणूक लढवण्याचे स्वप्न रंगवू लागला आहे त्यामुळे आता कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार यावरून महायुतीमध्ये वादंग उभे राहणार का याकडे सर्वांचे लक्ष लागला आहे.
याच संदर्भाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात एक गुप्त बैठक झाल्याची चर्चा ही रंगात आली आहे. ही बैठक भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या अनुपस्थितीत झाल्याने शिंदे व पवार यांच्या नेमकी काय चर्चा झाली याबाबत तज्ञांनी वेगवेगळ्या पद्धतीने अंदाज व्यक्त केला आहे. ही बैठक जवळपास तीन तास सुरू असल्याशिवाय माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. महत्त्वाचं म्हणजे ही बैठक वर्षा बंगल्यावर झाली.
भाजपाला दूर लोटून अजित पवार गट व एकनाथ शिंदे गट काही वेगळा प्लॅनिंग करता आहेत की काय अशीही शक्यता वर्तवली जात आहे. असे झाल्यास येत्या विधानसभा निवडणुकीदरम्यान फुटीचे राजकारण होत एक वेगळं चित्र राजकीय वर्तुळात पाहायला मिळणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळात महायुतीत जागा वाटपावरून वादंग उभे राहिले होते. या वादंगाचा थेट परिणाम महायुतीच्या तीनही पक्षांना जवळून अनुभवा लागला होता.
या वादंगाचा फटका महायुतीला बसल्याने आता तो फटका बसू नये व पुन्हा जागावाटपाच्या विषयावर विधानसभा निवडणुकीच्या काळात वाद उभा राहू नये यामुळे महायुती वेगळ्या पद्धतीने कामाला लागल्याच दिसत आहे. महायुतीकडून राज्यातील सर्वच जवळपास 288 जागांचा आढावा घेतला जात असल्याची माहिती देखील सूत्रांकडून मिळाली आहे त्यामुळेच आता तातडीने जागावाटप निश्चित करून महायुती सरकारमधील पक्ष निवडणुकीची रणनीती आखायला सुरुवात करणार आहे.
निवडणुकीच्या काळात होणाऱ्या गुप्त बैठका या राजकीय समीकरण बदलणाऱ्या असतात त्यामुळे शिंदे व अजित पवार या दोघांमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या अनुपस्थितीत झालेल्या बैठकीमध्ये नेमकी कोणती रणनीती आखण्यात आली याबाबत आता उत्सुकता लागली आहे.