आता छतावरच करता येणार वीज निर्मिती कारण महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी घेऊन आली आहे रूफटॉप सोलर Rooftop Solar योजना ज्यामुळे आता घरोघरीच होणार आहे वीज निर्माण त्यामुळेच आता वीज निर्माण करणे अतिशय सोपे झालेले आहे.
त्यामुळे आपल्याला फक्त आपल्या घराच्या छतावर सोलर पॅनल लावायला लागेल. म्हणजेच सर्व महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या ग्राहकांना आपल्या घरावरच सोलर पॅनल लावून वीज निर्माण करता येणे शक्य झालेले आहे.
सोलर पॅनल सिस्टम
विषयी update मिळवण्या साठी आमचा व्हाट्सअप गृप
जॉईन करा
येथे क्लिक करा
अशाप्रकारे घराच्या छतावरच आपण सोलर पॅनल लावून वीज बिलापासून मुक्त होऊ शकतो. त्याचप्रमाणे सोलर पॅनल ला लागणारा खर्च अगदी पाच वर्षातच वसूल होणारा आहे. आणि त्याबरोबरच पर्यावरणाच्या रक्षणातही आपला हातभार लागेल. तसेच घरावरच सोलर पॅनल लावल्यामुळे पैशाची देखील बचत होणार आहे.
Rooftop Solar : रूफटॉप सोलर योजने साठी असा करा अर्ज
तर या योजनेची वैशिष्ट्ये खालील प्रमाणे आहेत-
१. घरगुती वीज बिलात फारच मोठी बचत होणार आहे
२. घरगुती ग्राहक किंवा गृहनिर्माण रहिवाशी संस्था तसेच निवासी कल्याणकारी संघटनांना योजनेचा लाभ मिळणार आहे.
३. एक ते तीन किलोवॅट पर्यंत आपल्याला 40% अनुदान देखील मिळणार आहे.
४. तीन किलो वॅट पेक्षा अधिक ते दहा किलो वॅट पर्यंत विजेसाठी 20 टक्क्यांपर्यंतचे अनुदान मिळणार आहे.
५. सामूहिक वापराकरता 500 किलोवॅट पर्यंत तसेच प्रत्येक घरासाठी दहा किलो वॅट पर्यंत मर्यादा असणाऱ्या निवासी गृहनिर्माण संस्था या ग्राहकांना 20 टक्के अनुदान मिळणार आहे.
६. शिल्लक वीज महावितरण प्रति युनिट प्रमाणे विकत घेणार आहे.
तर आता आपण पाहूया रूफटॉप सोलर Rooftop Solar योजनेसाठी एक दोन व तीन किलोवॅटसाठी होणारा खर्च
1. रूफटॉप सोलर सिस्टिम क्षमता 1 किलोवॅट साठी अंदाजे खर्च 52000 रुपये इतका होईल आणि अनुदान 18000 रुपये पर्यंत असेल. प्रत्यक्ष खर्च 34500 आणि छतावरील जागा सुमारे 100 चौ. फु. लागेल.
दरमहा होणारी वीज निर्मिती ही 120 युनिट असेल आणि प्रति युनिट आठ रुपये दराने होणारी बचत 960 रुपये होईल
2.रूफटॉप सोलर सिस्टिम क्षमता 2 किलोवॅट साठी येणारा खर्च अंदाजे रुपये 1,05,000 एवढा असेल आणि अनुदान सुमारे 36000 रुपये पर्यंत मिळेल आणि प्रत्यक्ष खर्च 69000 पर्यंत होईल आणि लागणारी जागा 200 चौ. फु. व दरमहा होणारी वीज निर्मिती 240 युनिट एवढी असेल तसेच प्रति युनिट आठ रुपये दराने होणारी बचत 1920 रुपये असेल.
3. रूफटॉप सोलर सिस्टिम क्षमता 3 किलोवॅट साठी येणारा खर्च अंदाजे रुपये 1,57,000 असेल आणि अनुदान 54000 पर्यंत मिळेल प्रत्यक्ष खर्च 1,03,000 करावा लागेल आणि छतावरील जागा 300 चौ.फु. एवढी लागेल व दरमहा होणारी वीज निर्मिती ३६० युनिट पर्यंत असेल आणि प्रति युनिट आठ रुपये दराने होणारी बचत ही अंदाजे 2880 रुपये पर्यंत असेल.
तर मग आता सोलर पॅनल लावा आणि विजेचे बिल आयुष्यभरासाठी विसरा.
अधिक माहिती साठी
येथे क्लिक करा
Rooftop Solar : रूफटॉप सोलर योजने साठी असा करा अर्ज