आता सौर ऊर्जा निर्मितीसाठी प्रत्येक कुटुंबाला 78 हजार रुपये सबसिडी मिळणार आहे. तसेच यामध्ये गरजेपेक्षा अधिक वीज निर्माण जर झाली तर विज बिल शून्य असणार आहे. अर्थातच वीज ही मोफत मिळणार आहे आणि त्यासोबतच महावितरणाला जास्तीची वीज विकून उत्पन्न देखील मिळवता येणार आहे. म्हणजे ग्राहकांचा आता दुहेरी फायदा होणार आहे. Rooftop Solar
सोलर पॅनल सिस्टम
विषयी update मिळवण्या साठी आमचा व्हाट्सअप गृप
जॉईन करा
येथे क्लिक करा
प्रधानमंत्री – सूर्यघर मोफत वीज योजनेमध्ये ३ किलोवॅट क्षमतेच्या छतावरील सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून प्रत्येक कुटुंबाला 78 हजार रुपयापर्यंत सबसिडी देण्यात येणार आहे. तसेच घराच्या छतावर रूफटॉप सोलर वीज निर्मिती प्रकल्प बसवून सौर ऊर्जेचा वापर करून वीज निर्मिती करता येणार आहे, व ती वीज घरी वापरता येणार आहे आणि विजेची गरज आपण स्वतः पूर्ण करू शकणार आहोत. Rooftop Solar
यामध्ये गरजेपेक्षा अधिक वीज निर्मिती जर झाली तर विज बिल हे शून्य येते, अर्थातच वीज ही मोफत मिळते. त्यासोबत जी जास्तीत जास्त वीज तयार होते आहे ती महावितरणाला विकून उत्पन्न देखील मिळवता येणार आहे.
केंद्र सरकारच्या नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने जारी केलेल्या अध्यादेशानुसार, रूफटॉप सोलर सिस्टिम बसवणाऱ्या वीज ग्राहकांना दोन किलो वॅट एवढ्या क्षमतेपर्यंतची प्रत्येक किलो वॅट ला प्रत्येक 30000 रुपये अनुदान मिळणार आहे. अधिक एक किलोवॅट म्हणजे तीन किलोवॅट क्षमतेच्या सिस्टीमला म्हणजे सिस्टीम बसवणाऱ्या ग्राहकाला एका किलोवॅटला अठरा हजार रुपये अधिक ची सबसिडी मिळणार आहे.
Rooftop Solar : रूफटॉप सोलर योजने साठी असा करा अर्ज
अर्थातच एक किलोवॅटसाठी 30000, आणि दोन किलो वॅट साठी 60000, रुपये व तीन किलो वॅट करता 78000 रुपये अनुदान केंद्र सरकारकडून थेट मिळणार आहे. महाराष्ट्रात वीज ग्राहकांना रूफटॉप सोलर सिस्टिम बसवण्याकरता महावितरण मदत करणार आहे.
ग्राहकांनी https://pmsuryaghar.gov.in या पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करणे हे गरजेचे ठरणार आहे.तसेच पीएम सूर्य घर नावाचे मोबाईल ॲप देखील या साठी उपलब्ध आहे. वीज ग्राहकांनी कितीही क्षमतेची रूफटॉप सोलर सिस्टिम बसवली असली तरीही जास्तीत जास्त एकूण अनुदान प्रती ग्राहक 78000 रुपये एवढेच निश्चित असणार आहे
Rooftop Solar : रूफटॉप सोलर योजने साठी असा करा अर्ज
1. एक किलोवॅट क्षमतेच्या रूफटॉप सोलर सिस्टिम मधून दररोज सुमारे 4 युनिट अर्थात दरमहा सुमारे 120 युनिट वीज निर्माण होते.
2. महिना 150 युनिट पर्यंत वीज वापर करणाऱ्या कुटुंबाला 2 किलोवॅट पर्यंतची रूप-टॉप सोलर सिस्टम देखील पुरेशी आहे.
3. दरमहा 150 ते अंदाजे 300 युनिट वीज वापर असणाऱ्या कुटुंबासाठी दोन ते तीन किलोवॅट क्षमतेची सिस्टीम पुरेशी असते. आणि 13 फेब्रुवारी नंतर रूफटॉप सोलर साठी राष्ट्रीय पोर्टलवर अर्ज देखील दाखल करण्यात आलेले आहेत, आणि अर्ज दाखल केलेल्या सर्व ग्राहकांना केंद्र सरकारकडून नव्या दराने अनुदान मिळणार आहे.
20 फेब्रुवारीपर्यंत राज्यात रूफटॉप सोलर सिस्टिम बसवलेल्या वीज ग्राहकांची संख्या एक लाख सत्तावीस हजार सहाशे सेहेचाळीस आहे व त्यांची विषम विविध निर्मिती क्षमता 1907 मेगा वॅट एवढी झालेली आहे.