Pune Road : दिवे घाट ते हडपसर या राष्ट्रीय महामार्गावर म्हणजेच NH 965 वर चौपदरी रुंदीकरणाच्या प्रस्तावाला रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाकडून ७९२.३९ कोटी रुपयांच्या गुंतवणुकी सहीत अधिकृतरीत्या मान्यता मिळालेली आहे. हा प्रकल्प हायब्रीड मोडवर मंजूर झालेला प्रकल्प आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक तसेच महामार्ग मंत्री माननीय नितीन गडकरींच्या एक्स हँडलवरून मिळालेल्या अधिक माहितीवरुन “मोहोळ-आळंदी विभागामधील दिवे घाट परीसर ते हडपसर म्हणजेच पॅकेज-६ या राष्ट्रीय महामार्गाच्या ९६५ विद्यमान १३.२५ किलोमीटर लांबी असलेल्या चौपदरी विस्तार महाराष्ट्राला ७९२.३९ कोटींच्या निधीसहीत हायब्रीड मोडवर मंजुरी देण्यात आलेली आहे.”
यातच पुढे असे देखील म्हटलेले आहे की, या विस्तारानंतर चौपदरी रस्त्यामुळे हडपसर तसेच दिवे घाटातील वाहतूकीच्या समस्यावर आळा बसेल. तसेच आषाढीच्या वारी दरम्यान याच मार्गावरून १० लाखांपेक्षाही जास्त संख्येने वारकरी जात असतात. त्यामुळे अशा काळात देखील ४ लेनच्या विस्ताराने वाहतूकीची समस्या कमी होईल.”
राष्ट्रवादीच्या खासदार माननीय सुप्रियाताई सुळे यांनीही ट्विटरवर असे लिहिले आहे की, “आम्हाला कळविण्यात आनंद होत आहे की, रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने हडपसर पासून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९६५ च्या १३.२५ किलोमीटरच्या लांबीच्या चौपदरीकरणा करीता ७९२.३९ कोटींचा निधी मंजूर केलेला आहे. दिवे घाटाकडे हे काम पूर्ण झाल्यानंतर हडपसर ते दिवे घाट मार्गा वरील वाहतूकीच्या कोंडीची समस्या बऱ्याच अंशी सुटणार आहे. आणि संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी देखील याच मार्गावरून जाते. त्यामुळे या विस्तारानंतर या संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सोहळ्याला गर्दी देखील होणार नाही.