Take a fresh look at your lifestyle.

Pune Ring Road : साठी पश्चिम मार्गावरील भूसंपादन पूर्ण; 3000 कोटींचा निधी वितरित

Pune Ring Road : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या म्हणजेच एम एस आर डी सी च्या प्रस्तावित वर्तुळाकार रस्ता म्हणजेच रिंग रोड प्रकल्पातील पश्चिम मार्गावरील 34 गावांपैकी 31 गावांमधील 644 हेक्टर जमिनीचे भूसंपादन काम पूर्ण झालेले आहे.

2975 कोटींचा निधी देखील वितरित केला गेलेला आहे. भोर तालुक्यामधील ५ गावे वगळून शिवरे गावाचा समावेश झालेला आहे. संबंधित गावांमधील मूल्यांकनाचे दर आणि त्याची निश्चिती सध्या सुरू आहे. तोपर्यंत पूर्व भागांमधील हवेली, मावळ, खेड तसेच पुरंदर येथील जमिनीच्या भूसंपादनाबाबत जिल्हा प्रशासनाकडून तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश हे विभागीय आयुक्तांनीच म्हणजेच माननीय चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिले आहे.

Pune Ring Road विभागीय आयुक्त पुलकुंडवार यांनी रिंग रोड संदर्भातील कामकाजा संदर्भात आढावा बैठक देखील घेतलेली आहे. याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे एमएसआरडीसी चे अपर जिल्हाधिकारी हनुमंत अरगुंडे, आणि पूर्वेकडील भोर, हवेली, पुरंदर आणि खेड तालुक्यांचे प्रांतीय अधिकारी देखील उपस्थित होते, तसेच तहसीलदार व इतरही मान्यवर उपस्थित होते.

Pune – Aurangabad Expressway : पुणे ते छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस वेला मंजुरी, लवकरच तातडीने कार्यवाही सुरू….

Pune Ring Road यावेळी पुलकुंडवार यांनी तातडीने पूर्वेकडील गावांमध्ये नोटीस बजावून भूसंपादन करण्यास सुरुवात करावी असे आदेश दिलेले आहेत. त्यामुळे भूसंपादनाचे कार्य लवकरात लवकरच सुरू होईल असे दिसते आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्याच्या दृष्टीने एम एस आर डी सी च्या माध्यमातून 172 किलोमीटर लांबी आणि 110 मीटर रुंदीचा रिंग रोड हा महत्त्वकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आलेला आहे. हा प्रकल्प एकूण 2 टप्प्यात राबवण्यात येणार आहे.

Pune Ring Road पहिल्या टप्प्यात पश्चिम मार्गावरील भोरमधील 5, मुळशीतील 15, मावळ मधील 6 आणि हवेलीतील 11 गावांचा समावेश आहे. तसेच एकूण 650 हेक्टर जागा निश्चित करण्यात आली होती. परंतु, पुणे संभाजीनगर ग्रीन कॉरिडोर हे भोर तालुक्यातील कांजळे, कोळवडे, कांबरे, नायगाव आणि खोपी या 5 गावातून जात असल्यामुळे त्यातील तीन गावे वगळून शिवरे या गावाचा समावेश करण्यात आलेला आहे.

Pune Ring Road ची update मोबाईल वर मिळवण्यासाठी

येथे क्लिक करा 

त्यामुळे क्षेत्रफळ देखील कमी होत असल्याने नव्याने समाविष्ट गावांमधील जमिनीचे दर काढण्यासाठी मूल्यांकन प्रक्रिया राबवण्यात आलेली आहे. आणि पूर्वेकडील गावांमध्ये भूसंपादन लवकरात लवकर सुरू करण्यात यावी असे पुलकुंडवार यांनी सांगितले आहे. पूर्व मार्गावरील मावळ मधील 11, खेडमधील 12, हवेलीतील 15, भोरमधील 3, आणि पुरंदर मधील 5 या गावांचा समावेश असून खेड तालुक्यातील भूसंपादनाबाबत त्या त्या गावातील शेतकऱ्यांना नोटीसा देखील पाठवण्यात आलेल्या आहेत.

खेडमधील स्थानिकांना भूसंपादनाबाबत मुदत वाढीनुसार 1 महिन्याच्या कालावधी संपुष्टात येत असल्याकारणाने शेतकऱ्यांकडून स्वयंघोषणापत्र घेण्यात सुरुवात करण्यात आलेली आहे. तर उर्वरित मावळ तालुक्यातील 11 व हवेली तालुक्यातील 15 गावांबद्दल तातडीने भूसंपादनासाठी प्रांतीय अधिकारी आणि तहसीलदार व एमएसआरटीसी च्या अधिकाऱ्यांनी देखील तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.