Pune – Aurangabad Expressway : सध्या भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने म्हणजेच एन एच ए आय ने पुणे ते संभाजीनगर हरित महामार्ग विकसित करण्याचा निर्णय घेतलेला आहे. हा महामार्ग राज्य रस्ते विकास महामंडळाने म्हणजेच एमएसआरडीसी ने एम एस आर डी सी ने प्रस्तावित केलेला पुणे रिंगरोड एकूण बारा गावांमधून जाणार आहे.
Pune – Aurangabad Expressway
हे अंतर 31 किलोमीटर एवढे आहे, पुणे व पिंपरी चिंचवड शहरांमधील कोंडी फोडण्याकरता रस्ते महामंडळ आयोगाने रिंग रोडचे काम हाती घेतले आहे. या 31 किलोमीटर मधील रस्त्यांकरता भूसंपादनाचे काम तसेच विकसनाचे काम एन एच ए आय कडून केले जाणार आहे असे स्पष्ट झाले आहे. या रस्त्याचे पूर्व आणि पश्चिम असे दोन भाग करण्यात आलेले आहेत.
तसेच पूर्व भागातील रस्ता म्हणजेच खेड, मावळ, हवेली, भोर आणि पुरंदर अशा पाच तालुक्यामधून जाणार आहे. तो सुमारे 66 किलोमीटर एवढ्या लांबीचा आहे, तसेच तो चार राष्ट्रीय महामार्गांना जोडणार आहे. पूर्व भागातील रस्ता अंतिम असल्यामुळे त्याचा समावेश पुणे महानगर विकास प्राधिकरणाच्या विकासा आराखड्यामध्ये करण्यात आलेला आहे. या रोडला राज्य सरकारने अंतिम मान्यता दिलेली आहे तसेच त्याबाबतचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाकडून काढण्यात आलेले आहेत. तसेच हा रस्ता पुणे साताऱ्या रोडवरील वरवे बुद्रुक येथून सुरू होऊन पुणे- मुंबई द्रुतगती महामार्गावरील उसे ला येऊन मिळणार आहे. तसेच केंद्राने पुणे- संभाजीनगर या हरित महामार्गाची घोषणा देखील केलेली आहे.
286 किलोमीटर लांबीचा हा महामार्ग आहे,तो रस्ते महामंडळाच्या वर्तुळाकार रस्त्याला येऊन मिळणार आहे. पूर्व भागातील बारा गावांमधील दोन्ही रस्ते एकत्रित जाणार आहे. त्याचे अंतर सुमारे 31 किलोमीटर एवढे आहे. त्यामुळेच या बारा गावातील रस्त्याचे काम एन एच ए आय ने करावे आणि त्यासाठी येणारा खर्च देखील त्यांनीच करावा असा हा प्रस्ताव मांडण्यात आला होता. त्यामुळे वर्तुळाकार रस्त्यासाठी म्हणजे पुणे रिंगरोड साठी या बारा गावातील जमीन संपादित करणे, आणि प्रस्ताविक करण्यासाठी येणारा अंदाजे ५०००-५५०० कोटी रुपयांचा खर्च देखील एन एच ए आय ने करावा असे ठरलेले आहे.
आता पाहूया पूर्व भागातील पुणे रिंगरोड :
१. पुणे- मुंबई द्रुतगती महामार्ग- नाशिक- सोलापूर आणि सातारा महामार्गाला जोडणारा.
२. याची एकूण लांबी सुमारे 66.10 किलोमीटर तर 110 मीटर रुंदीचा हा सहा पदरी महामार्ग आहे.
३. एकूण प्रत्येकी सात बोगदे आणि भुयारी मार्ग तसेच दोन नदीवरील बोगदे देखील आहेत आणि लोहमार्गावरील ओलांडणी पूल हे सुद्धा समाविष्टीत करण्यात आलेले आहेत.
४. तसेच 524 हेक्टर जागेचे संपादन देखील आहे.