Take a fresh look at your lifestyle.

Pune – Aurangabad Expressway : पुणे अहमदनगर – संभाजीनगर ग्रीनफिल्ड एक्सप्रेस प्रकल्प दिल्लीत अडकला. केव्हा सुरू होणार?

Pune – Aurangabad Expressway : राज्यासहीतच संपूर्ण देशभरामध्ये भरपूर महामार्गाची कामे सध्या चालू आहेत. रस्ते वाहतूक सुधारण्याकरिता खूप महामार्ग तयार करण्याची कामे सध्या हाती घेतली जात आहेत. या कामांमध्ये उपराजधानी नागपूर ते महाराष्ट्राची राजधानी मुंबई पर्यंतच्या समृद्धी महामार्गाचा देखील समावेश होत आहे. समृद्धी महामार्गाचे काम आता सध्या अंतिम टप्प्यात आलेले आहे.

Pune – Aurangabad Expressway ची update मोबाईल वर मिळवण्यासाठी

येथे क्लिक करा 

जो समृद्धी महामार्ग 700 किलोमीटर लांबीचा आहे, त्यातील 600 किलोमीटरचे काम अगोदरच पूर्ण झालेले आहे. आणि नागपूर ते भरवीर पर्यंत च्या पूर्ण झालेल्या मार्गावर वहाने धावायला देखील लागलेली आहेत. तसेच उर्वरित 100 किलोमीटरचे काम या वर्षात पूर्ण होईल, आणि संपूर्ण महामार्ग याच वर्षात पूर्ण होत आहे.

तसेच राज्यात इतरही अनेक महामार्गाची कामे सध्या प्रस्तावित करण्यात आलेली आहेत. त्या महामार्गांमध्ये पुणे-अहमदनगर- संभाजीनगर या ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे चा देखील समावेश आहे हा महामार्ग गेल्यावर्षी प्रस्तावित करण्यात आला होता. या मार्गाची घोषणा स्वतः केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री माननीय नितीन गडकरी यांनी केलेली होती. तसेच या महामार्गाची एकूण लांबी 268 किमी एवढी आहे हा महामार्ग 6 पदरी आहे तो पुणे, अहमदनगर, बीड आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांसाठी अतिशय आवश्यक आणि महत्त्वाचा असा महामार्ग असणार आहे.

या महामार्गाचे सर्वाधिक अंतर हे नगर जिल्ह्यामध्ये आहे. अहमदनगर जिल्ह्यामध्ये या महामार्गाची लांबी 126 किलोमीटर एवढी आहे. तसेच या महामार्गाचे छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात 55 किलोमीटर एवढे अंतर आहे.आणि बीड जिल्ह्यात 6 किलोमीटर व पुणे जिल्ह्यात 80 किलोमीटर एवढे अंतर आहे. हा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर यावरून 120 किलोमीटर प्रति तास या वेगाने वाहने धावणार आहेत. त्यामुळे पुणे ते छत्रपती संभाजीनगर हा प्रवास अगदी कमी वेळात म्हणजेच अडीच तासातच पूर्ण होईल, असा दावा व्यक्त केला जात आहे. याशिवाय पुणे ते अहमदनगर हा प्रवास फक्त आणि फक्त 75 मिनिटात म्हणजे अगदीच कमी वेळात पूर्ण होईल असे सांगितले देखील जात आहे.

Pune – Aurangabad Expressway ची update मोबाईल वर मिळवण्यासाठी

येथे क्लिक करा 

Pune – Aurangabad Expressway

या महामार्गासाठी जवळपास साधारणतः 11 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यापैकी सर्वाधिक खर्च हा अहमदनगर जिल्ह्यात अंतर जास्त असल्यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील मार्गांसाठी होणार आहे, आणि अहमदनगर जिल्ह्यातील मार्गांसाठी जवळपा स साधारणतः 5411 कोटी रुपयांचा खर्च होईल असा एक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र हाच बहुचर्चित आणि राज्यांमधील चार अतिशय महत्त्वाच्या जिल्ह्यासाठी असणारा महामार्ग आता होतो की नाही, अशी शक्यता निर्माण झालेली आहे.

कारण या महामार्गाचा प्रस्ताव गेल्या एक वर्षापासून केंद्रीय भूसंपादन समितीकडे मंजुरी करता दिलेला आहे, तरीही तो अजून प्रलंबितच आहे. केंद्रीय समितीने या प्रस्तावाला मंजुरी दिली नसल्याने महामार्गासाठी असणारी भूसंपादनाची प्रक्रिया अगदी लांबणीवर पडलेली आहे, असे म्हटले तरी चालेल. या प्रकल्पास निधीची कमतरता भासत असल्या कारणाने हा प्रलंबित असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे एवढा 11000 कोटी रुपयांचा प्रकल्प असून सुद्धा तो डगमगतो की काय अशी भीती देखील लोकांच्या मनात निर्माण झालेली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.