Pune – Aurangabad Expressway : या मार्गामुळे पुणे ते छत्रपती संभाजी नगर हे अंतर दोन तासात – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
Pune – Aurangabad Expressway : केंद्रीय मंत्री माननीय नितीन गडकरी यांच्या कामांचे विरोधक देखील कौतुक करतात त्यांचे कामांचे नियोजन अतिशय व्यवस्थित असते. त्यांची रस्त्यांबाबतची कामे अतुलनीय आहेत. काल म्हणजेच 26 फेब्रुवारी रोजी विविध विकास कामांचे लोकार्पण करण्यासाठी ते अहमदनगर मध्ये देखील आलेले होते. यावेळी तर त्यांनी खूप मोठी घोषणा केली.
Pune – Aurangabad Expressway : पहा पुणे ते संभाजीनगर महामार्ग बद्दल नवीन Update
नगर मधील बायपास रस्ता व नगर करमाळा रस्ता अशा तीन हजार कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण माननीय श्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार राम शिंदे, बबनराव पाचपुते, आणि आमदार मोनिकाताई राजळे, तसेच खासदार सुजय विखे पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. नगर शहराच्या बाहेरून नवा रस्ता शिरूर ते पुणे असा उड्डाणपूल आणि त्यावर मेट्रो असे 50 हजार कोटींचे उड्डाणपूल देखील मंजूर आहेत, तसेच त्यांची कामे सध्या सुरू आहेत. आता सध्या शिरूर ते छत्रपती संभाजी नगर असा नवीन महामार्ग करायचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे.
नगर शहराच्या बाहेरून हा रस्ता जाणार आहे त्यामुळे पुणे ते संभाजीनगर हे अंतर अवघ्या दोन तासात व पुणे ते नगर हे अंतर किमान एक तासात पार करता येईल असे देखील मंत्री गडकरी म्हणाले नागपूर ते पुणे हे अंतर अवघ्या साडेचार तासात पार करता येईल असे मंत्री गडकरी म्हणाले.
या रस्त्यांसाठी लाईन आउट निश्चित देखील झालेला आहे पुणे ते छत्रपती संभाजी नगर हे अंतर दोन तासात पूर्ण होईलच,आणि त्यापुढे समृद्धी महामार्गाने नागपूरला देखील जाता येईल असे आहे, आता समृद्धी महामार्ग देखील पूर्ण स्थितीत आहे. त्यामुळे वाहनांची होणारी कोंडी कमी होईल आणि म्हणूनच सुमारे साडेचार तासात नागपूर ते पुणे हे अंतर कापता येईल. आणि यामुळे विकासाला मोठी चालना मिळेल असा विश्वासही श्री मंत्री गडकरी यांनी व्यक्त केला आहे.
Rooftop Solar : रूफटॉप सोलर योजने साठी असा करा अर्ज
तीन नवीन कामांची घोषणा:
१. माळशेज घाट, अणे घाट, नगर बायपास, खरवंडी कासार ते छत्रपती संभाजीनगर- सोलापूर रस्त्यावर एन एच 52 जंक्शन पर्यंत 163 किलोमीटर 400 कोटी खर्चाचे कॉंक्रिटीकरण करण्यात येणार आहे.
२. नगर ते सबलखेड आष्टी व चिंचपूर या 49 किलोमीटरच्या कामासाठी 670 कोटी मंजूर तसेच
३. नांदूर शिंगोटे ते कोल्हार या 48 किलोमीटर रस्त्यासाठी 350 कोटी रुपये मंजूर केल्याची घोषणा मंत्री नितीन गडकरी यांनी केली.