Pawar Vs Kolhe : वळसे, आढळरावांचा पत्ता कापला?, शिरूरमध्ये कोल्हे विरुद्ध अजितदादांचा जुना निष्ठावंत मैदानात?
Pawar Vs Kolhe : येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत शिरूर मतदार संघातील लढाई सुद्धा प्रतिष्ठेची होणार आहे, त्याचे एक कारण म्हणजे आपल्याला माहिती असेलच ते म्हणजे डॉ. अमोल कोल्हे आणि दुसरे म्हणजे शिवाजीराव आढळराव पाटील. आणि आता त्यात अजितदादा विरुद्ध डॉ. कोल्हे ही लढाई देखील आहेच. म्हणजेच, अजित दादांनी डॉक्टर अमोल कोल्हे यांचा पराभव करण्याचे चॅलेंज देखील स्वीकारलेले आहे. त्यामुळे बारामती आणि शिरूर हे लोकसभेचे मतदारसंघ या बदलत्या कारणांमुळे चांगलेच चर्चेत आहेत.
Pawar Vs Kolhe
अशातच महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडीचा उमेदवार हे अमोल कोल्हे असल्याचे निश्चित आहे परंतु त्यांच्याविरुद्ध विरोधी उमेदवार देताना अजितदादांची सुद्धा दमछाक होण्याची वेळ आली असल्याचे दिसून येत आहे. तसेच महायुती मधून तीन टर्म खासदार राहिलेले शिवाजीराव आढळराव पाटील व शिरूर मधून दिलीप वळसे पाटलांच्या नावाची ही चर्चा मध्यंतरीच्या काळात जोरदार तग धरून होती. परंतु आता अचानकच यात तिसरे नाव देखील समोर आलेले आहे, ते म्हणजे प्रदीप कंद.
पण हे प्रदीप कंद नेमके कोण?
हे तेच प्रदीप कंद आहे जे आधी राष्ट्रवादी पक्षामध्ये होते आणि मूळचे लोणीकंद गावचे रहिवासी आहेत. त्यांनी पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पद भूषविले आहे.ते अजित दादांचे कट्टर समर्थक देखील आहेत आणि राष्ट्रवादीतच वाढलेले अशीही त्यांची ओळख होती. परंतु, ते आता राष्ट्रवादीत नाहीत म्हणजेच 2014 च्या विधानसभेच्या निवडणुकीआधी त्यांनी पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आणि नंतर अध्यक्षपदाची संधी देखील मिळवली होती. तसेच कंद हे 2014 साली देखील विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक होते. परंतु, पक्षाने त्यांना उमेदवारी दिली नव्हती. मग त्यांनीच भाजपात प्रवेश केला, आणि पूर्वी अजित दादांचा समर्थक असलेला प्रदीप कंद यावेळेस अजितदादांच्या बाजूने लढणार असल्याची चर्चा शिरूर लोकसभा मतदारसंघात जोरदार सुरू आहे. Pawar Vs Kolhe
फडणवीसांशी जवळीक:
प्रदीप कंद यांना कोरोनाची लागण झाली त्यावेळी पुण्यात हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आले. तिथून पुना हॉस्पिटल आणि नंतर मुंबईच्या लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती अतिशय गंभीर झाली होती या काळात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे दररोज त्यांच्या उपचाराचा आढावा घेत होते. आणि अशा परीस्थितीत देखील लिलावतीत फोन करून आजारपणाची माहिती घेत होते असे स्वतः कंद यांनी आपल्या अनुभवातून सांगितले होते.
त्यामुळे कंद आणि फडणवीस यांच्यात घनिष्ठ संबंध निर्माण झाले होते. खरंतर विधानसभा गेली पण आता लोकसभेची संधी मिळत असल्याकारणाने प्रदीप कंद देखील यासाठी तयार आहेत. खरं तर पण याला फडणवीसचा हिरवा कंदील देखील मिळायला हवा, असे कंद यांनी म्हणले आहे. लोकसभेची जागा अजितदादांच्या गटाने मागितलेली आहे त्यामुळे जर अजितदादा उमेदवार द्यायचा असेल तर ते प्रदीप कंद असणार असतील तर, कंद यांना भाजपातून पुन्हा मागे जाऊन राष्ट्रवादीत प्रवेश करावा लागणार आहे. कारण प्रदीप कंद यांना उमेदवारी देण्यासाठी शिरूर लोकसभा मतदारसंघांमधील अजित पवार गटाचे जुन्नर चे आमदार अतुल बेनके, आणि खेडचे आमदार दिलीप मोहिते, व तसेच आंबेगावचे आमदार दिलीप वळसे पाटील यांचीही प्रदीप कंद यांच्या नावावर सहमती असल्याचे दिसते आहे.
त्यामुळे स्वतः अजित पवार यांनी प्रदीप कंद यांना लोकसभा लढवण्यासाठी विचारणा केल्याचे केल्याचे समजते आहे तरी कंद यांचा अजित पवार गटात प्रवेश आणि शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी याकरता फक्त आणि फक्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच ग्रीन सिग्नल ची प्रतीक्षा आहे.
प्रदीप कंद यांची प्रतिक्रिया:
वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल. देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्यास मी शिरूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवेल, त्यासाठी पक्ष बदलावा लागला तरी त्याकडे महायुतीचा उमेदवार म्हणून पाहिले जाईल. आणि माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाप्रमाणे मी पक्ष बदल किंवा लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेणार आहे. पक्षाचे वरिष्ठ आणि पक्ष जो काही निर्णय देतील तो मला मान्य असेल.
डॉ. अमोल कोल्हे यांची प्रतिक्रिया:
ते म्हणतात प्रदीप कंद हे माझे अतिशय चांगले मित्र आहेत त्यांना उमेदवारी मिळाली तर मलाही आनंदच असणार आहे. महायुती मधून कोण लढणार हे अजून ठरलेले नाही, परंतु माझ्या मित्राचे नाव असेल तर मला देखील आनंद आहे. आणि शिरूर कोण लढणार हेच सध्या कळेनासे झाले आहे हे असे घडणार असेल तर प्रदीप कंद हे आयात उमेदवार आहेत. असे माझे म्हणणे आहे मी उमेदवार कमी लेखत नाही शिरूर मधून आढळराव होते, भोसरी मधून लांडे पण इच्छुक होते, आता हे दोघे काय करतात हे पण पहावं लागेल. अशा शब्दांमध्ये डॉ. अमोल कोल्हे यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे