संपत्तीच्या वादातून सख्या भाऊ व वहिनीनेच केला खून… पुण्यातील खराडी परिसरातील नदीपात्रात सापडला मृतदेह…
पुण्यातील खराडी परिसरातील नदीपात्रामध्ये तीन दिवसांपूर्वी एका महिलेचा मृतदेह सापडला होता. या प्रकरणी अधिक तपास केला असता या प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. संपत्तीच्या वादातून या महिलेचा सख्खा भाऊ आणि वहिनीने हा खून केलाच निष्पन्न झालं आहे. या दोघांनी हा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी शीर धडा वेगळं केलं होतं. हात पाय मृतदेह नदीपात्रात फेकून दिला. अशा अवस्थेत हा मृतदेह पोलिसांच्या हाती लागला होता.
सकीना खान असं मृत व्यक्तीचं नाव आहे. या खून झालेल्या मृतदेहाची ओळख पटत नसल्याने पोलिसांना कसौशीने सूत्र हलवावी लागली. यादरम्यान पोलिसांनी बेपत्ता महिलांची माहिती घेण्यास देखील सुरुवात केली. या महिलेचे अवयव हे धडा वेगळे करण्यात आले असल्याने ते शोधणं मोठं जोखमीचं काम होतं. परंतु पोलिसांनी ड्रोन कॅमेरा चा वापर करत या महिलेचे अवयव शोधण्याचा प्रयत्न केला. तर पोलिसांच्या पथकाने येरवडा खराडी चंदन नगर वडगाव शेरी या भागात देखील तपास केला. तपासांती पोलिसांच्या लक्षात आलं की सदरचा खून हा संपत्तीच्या वादातून झालेला आहे.
सदरचा खून हा सख्या भावानेच आपल्या पत्नीच्या मदतीने केला असल्याचे पोलीस तपासामध्ये निष्पन्न झाले आहे. ही खात्री पटल्यानंतर पोलिसांनी सदर खून झालेला महिलेच्या भावाला व त्याच्या पत्नीला ताब्यात घेतले असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
अश्फाक खान व त्याची पत्नी हमीद खान या दोघांना पोलिसांनी या खुणाप्रकरणी अटक केली आहे. सदर आरोपींची अजून चौकशी सुरू असून या चौकशी अंत्य देखील बऱ्याच महत्त्वाच्या बाबी समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
सदरची घटना ही बहिण भावाच्या नात्याला काळीमा फासणारी असून संपत्तीच्या लालसे पोटी आपल्या सख्या बहिणीचा खून करणे हे अतिशय निंदनीय म्हणावी लागेल.