Take a fresh look at your lifestyle.

बाबासाहेब..,आम्हाला माफ करा.. आम्ही नपुंसक आहोत..! ‘जिल्हा मराठा’ असेल मृत्यूला जबाबदार !

पीडित शिक्षकाचा संस्थेला इशारा; न्यायालयात गेल्याने चिडून बदली केल्याचाही दावा भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समस्त आंबेडकरी जनतेला खूप मोलाचा सल्ला दिला होता. शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा, असे ते म्हणाले होते. त्यामुळेच काही प्रमाणात शिक्षण आणि संघटनही झाले. तथापि, ज्या-ज्यावेळी खऱ्या संघर्षाची वेळ आली. त्या-त्यावेळी नेतेगिरी करणाऱ्यांनी केवळ स्वतःचीच दुकानदारी पाहिली का? असा जाब विचारण्याची वेळ आली आहे.

एका बळीला न्याय मिळण्याअगोदरच दुसऱ्याने माझ्या जीवाचे काही बरे वाईट होण्याअगोदरच न्याय द्या, अशी कैफियत मांडल्याने न्याय मिळवून देण्यासाठी बोंबलणारी व्यवस्था केवळ बोलघेवडी असल्याचे सिद्ध होते, यात शंका नाही. म्हणूनच वंदनीय बाबासाहेब आम्हाला माफ करा.. आम्ही नपुंसक आहोत, असे म्हणायची वेळ आली आहे, असे म्हटल्यास ते अतिशयोक्तिचे ठरू नये.

अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेत सेवेत असलेल्या हिंदी विषयाचे ज्ञानदान करणारे विनाअनुदानित तत्वावरील शिक्षक डॉ. बाळासाहेब फुलमाळी यांचा मागील दहा दिवसांपूर्वी मृत्य झाला. तो अतिरिक्त तणावातून झाल्याचे दावा आहे. तथापि, दशक्रिया झाला तरी फुलमाली यांच्या कुटुंबासाठी अपेक्षित संघर्ष अजून कुणीच उभा केल्याचे किमान ऐकिवात फुलमाळी यांच्यासह अन्य तीन शिक्षकांनी अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या.

संस्थेच्या विरोधातील या भांडणात न्यायालयाने पीडित शिक्षकांच्या बाजुने निकाल दिला होता. नियमित आणि पुरेसा पगार द्यावा, अशा मागणीचे ते भांडण होते. तथापि, त्यावर अंतिम निर्णय होण्याअगोदरच बाळासाहेब फुलमाळी यांची प्राणज्योत मालवली. आता त्यात आपलाही बळी जाण्याचीच दाट शक्यता वाटल्याने तेथेच सेवेत असलेले दुसरे पीडित शिक्षक डॉ. राजू साळवे यांनी संस्थेला निवेदन दिले आहे. साळवे यांचे ते पत्र चिंतन करायला लावणारे आहे.

आता या इशाऱ्यानंतरही नाही. ‘त्या’ शिक्षकांना धन्यवाद द्या..! केवळ गावगप्पा मारण्याऐवजी डॉ. फुलमाळी यांच्या कुटुंबाला कशी मदत करता येईल, यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील हिंदी विषयाचे तसेच ‘जिल्हा मराठा’तील हिंदी विषयांच्या आणि डॉ. सुधाकर शेलार यांच्यासारख्या संवेदनशील मनाच्या माणसांनी मदतनिधी उभारण्यासाठी प्रयत्न केले. त्यासाठी क्युआर कोड व्हायरल करुन मदतनिधी थेट फुलमाळी यांच्या पत्नीच्या बँक खात्यात पाठविण्याचे आवाहन अनेकांना केले. त्यातून मदतीचा चांगला ओघ वाहिला. डॉ. फुलमाळी यांच्या परिवारासाठी तो नक्कीच आधार ठरेल.

मात्र, ज्यांनी केवळ घोषणाच केल्या, ते नेते नंतर कुठे गायब झाले, याचे कोडे अजून उलगडलेले नाही. म्हणूनच आता नेत्यांनी चावडीवरच्या गावगप्पा मारण्याऐवजी डॉ. फुलमाळी यांच्या कुटुंबाला मदत करावी आणि डॉ. साळवे यांचा नवीन बळी जाणार नाही, याची दक्षता घ्यायला हवी. नेत्यांना दुकानदारीत इंटरेस्ट…! डॉ. बाळासाहेब फुलमाळी यांचा २१ नोव्हेंबर २०२३ रोजी ऑनड्युटी मृत्यू झाला. त्यामुळे त्यांना खरेतर संस्थेनेही भरीव मदत देण्याची अपेक्षा होती.

तथापि, त्याकडे किती गांभीर्यपूर्वक पाहिले गेले, हे सर्वश्रुत आहे. फुलमाळी यांच्या मृत्यूनंतर दैनिक लोक आवाजने त्यावर आर-पारमधून परखड भूमिका मांडली. ‘डॉ. फुलमाळी ‘जिल्हा मराठा’च्या व्यवस्थेचे बळी!’, अशा मथळ्याखाली परखड लेखन केले. त्या लिखाणाचे राज्यभरात वाचन झाले. अनेकांनी त्याबद्दल लोकआवाजच्या धन्यवादही दिले. तथापि, त्यातून प्रश्न सुटत नाही किंवा भागतही नाही.

फुलमाळी यांना मरणोत्तर न्याय मिळवून देण्याची भूमिका लोकआवाजशी बोलताना ज्यांनी मांडली, त्यांनी पुढे काय केले, हा खरा प्रश्न आहे. डॉ. फुलमाळी यांचा काल दशक्रियाविधी झाला. मात्र, परिवार अजूनही उपेक्षितच आहे, हीच काय ती शोकांतिका. फुलमाळी यांचा संस्थेकडे अडकलेला कथित पगार काढून देण्यासाठी तसेच फुलमाळी यांच्या परिवारातील पत्नी किंव अन्य कुणाला संस्थेत नोकरी देण्यासाठी संघर्ष करण्याची भाषा करणारे नंतर कुठे गायब झाले, तेच उमगलेले नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.