राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनी शरद पवार गटातून बाहेर पडत आपला स्वतंत्र पक्ष स्थापन केला त्यामुळे राजकीय वर्तुळात काका आणि पुतण्या मध्ये फुटीचे राजकारण रंगलाच आपल्याला पाहायला मिळालं. परंतु काका पुतण्या राजकीय संघर्ष सुरू असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे नेते तथा अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या मुलीने बंड केले आहे. Sharad Pawar
आदराम यांची मोठी मुलगी भाग्यश्री आत्राम यांनी ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हे बंड पुकारल्यामुळे अहेरी विधानसभेचे राजकीय समीकरण बदलणार असल्याचे चित्र निर्माण झाल आहे. काका पुतण्याच्या बंडा मध्ये आता अत्राम यांच्या मुलीने उडी घेतलाच चित्र निर्माण झाल्याचे दिसत आहे. यामुळेच आता अत्राम यांच्यासमोर मोठ आव्हान उभा राहिला आहे. अवघ्या दोन महिन्यांवर विधानसभा निवडणूक येऊन ठेपले आहेत.
विधानसभा निवडणुकीसाठी गडचिरोली जिल्ह्यात राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केलाच दिसत असतानाच अशा प्रकारच्या राजकीय घडामोडी घडवू लागले आहेत. त्यामुळे आता गडचिरोली जिल्ह्यातील राजकीय समीकरण बदलणार का? असाही मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. Sharad Pawar
गडचिरोली जिल्ह्यातील राजकीय दृष्ट्या सर्वात वजनदार समजल्या जाणाऱ्या अहेरी विधानसभेत मात्र आता महायुती व महाविकास आघाडी मध्ये फुटीचा राजकारणाबरोबरच जागा वाटपावरून मोठ्या प्रमाणात वादंग उभे राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अत्राम यांच्या मुलीने बंड करत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट केल्याने अत्रम यांना हे मोठे राजकीय आव्हान दिल्याचे बोलले जात आहे. निवडणुकांच्या पूर्वसंध्येला अशाप्रकारे पक्ष बदल व इच्छुक उमेदवार जागा मिळवण्यासाठी या पक्षातून त्या पक्षात उड्या घेत असतात. यामुळे मात्र राजकीय वर्तुळात मोठी आव्हान उभे राहतात.
आता गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी विधानसभेत मुलगी आणि वडील यांच्यात लढत पाहायला मिळणार का? या प्रकारच्या चर्चांना उधाण आला आहे. तर अत्राम हे जाणून बुजून खेळीच राजकारण करतात की काय असाही सवाल उपस्थित केला जात आहे. शरद पवार व अजित पवारांप्रमाणेच अत्राम काका पुतण्यांमध्ये देखील टोकाचा वाद पाहायला मिळत असतानाच आता या वादात भाग्यश्री आत्राम यांनी उडी घेतल्याने तिहेरी राजकीयवाद निर्माण झाला आहे. आता हा संघर्ष काका पुतण्यांपर्यंत मर्यादित राहिला नसून मुलगी व वडिल तसेच काका व पुतण्या असा तिहेरी संघर्ष निर्माण झाला आहे. या विधानसभा निवडणुकीदरम्यान पहिल्यांदाच मोठ्या राजघराण्यातील तीन उमेदवार एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवणार असल्याबाबत मोठ्या प्रमाणावर चर्चा होत आहेत.
गडचिरोली-चिमूर लोकसभेवर मंत्री आत्राम यांनी महायुतीकडून दावा केला होता. परंतु त्यांना ऐनवेळेवर उमेदवारी नाकारण्यात आली. त्यामुळे महायुतीकडून अहेरी विधानसभेवर त्यांचा दावा अधिक मजबूत असल्याचं बोलाlल जात आहे, त्यांनी विधानसभेची तयारी जोरात सुरू केली आहे. तर दुसरीकडे पक्ष बदलाच्या चर्चेत काही काळ शांत बसलेले भाजपचे अम्ब्रीशराव आत्राम पुन्हा सक्रिय झाले आहे. त्यामुळे दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून महायुतीकडून कोणाला उमेदवारी मिळणार यासाठी नेत्यांसह नागरिकांमध्येही उत्सुकता आहे.