Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा दुसरा हप्ता कधी मिळणार? जाणून घ्या सविस्तर वृत्त.
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरल्यानंतर पहिला हप्ता काही महिलांच्या बँक खात्यात जमा झाल्याबाबत बोललं जात असताना आता दुसरा हप्ता येणार कधी याबाबत चर्चेला मोठा उधाण आलं आहे. अशातच आता लाडकी बहीण योजनेचा दुसरा हप्ताही महिलांना मिळणार असल्याबाबत वृत्त सूत्रांकडून समजले आहे.
पहिला हप्ता हा एक जुलै ते 31 जुलै या दरम्यानचा मिळाला असून ऑगस्ट महिन्यातील लाडकी बहीण योजनेचा हप्ता देखील मिळणार असल्याबाबत चर्चा जोर धरू लागली आहे. याबाबतची माहिती महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे. तर या संदर्भातला कार्यक्रम हा नागपूर मध्ये होणार असल्याबाबत देखील माहिती देण्यात आली आहे.
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आलेल्या अर्जांची पडताळणी हे अद्याप पूर्ण झाली नसून ज्यांच्या अर्जाची पडताळणी पूर्ण झाली आहे त्यांच्या बँक खात्यामध्ये सदर योजनेचा हप्ता पोहोच झाला आहे. ज्या महिलांनी या योजनेसाठी 31 जुलै नंतर अर्ज केले आहेत त्यांच्या अर्जाची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर सदर योजनेचा लाभ त्यांना मिळणार आहे.
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना प्रारंभ झाल्यापासून महिला वर्गामध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. ही योजना म्हणजे निव्वळ चर्चेचा विषय असून कोणाच्याही खात्यात पैसे येणार नाही अशा अफवांना बळ आले असताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता महिलांच्या खात्यात जमा झाल्यानंतर माननीय पंतप्रधानांनी जनधन खात्यात 15 लाख रुपये येतील हे आश्वासन दिले होते या आश्वासनासारखे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा असं होणार नाही यावर आता नागरिकांचा विश्वास बसू लागला आहे.
या योजनेचे ठिकठिकाणी पोस्टर्स लावून जाहीरात केली जात आहे. तसेच समाज माध्यमांमध्ये देखील सदर योजनेची माहिती दिली जात आहे. यामुळे काही प्रमाणात या योजने वर व मुख्यमंत्र्यां वर मोठ्या प्रमाणावर विरोधकांकडून टीका होताना दिसत आहे.
या योजना निवडणूकीच्या पूर्वसंध्येला जाहीर करत माता भगिनींना फासण्याचा प्रकार सुरू असल्याची ही टीका करण्यात येत आहे.
नुकताच मागील काही दिवसांपूर्वी 1 जुलै ते 31 जुलै दरम्यान चा पहिला हप्ता महिलांच्या खात्यात जमा करत महिलांना रक्षा बंधन चे मोठे बक्षीस मिळाले. आता मात्र 31 ज्यानी या योजनेसाठी अर्ज केले आहेत. त्यांच्याही अर्जाची पडताळणी होऊन त्या सदर योजनेस पात्र ठरल्यास त्यानाही या योजनेचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे महिला वर्गामध्ये आनंद व समाधानाचे वातावरण पसरले आहे. तर अद्याप ज्यांच्या खात्यात या योजनेचे पैसे जमा झाले नाही त्या महिला मात्र या योजनेचा लाभ मिळण्याच्या प्रतिक्षेत असतानाच अदिती तटकरे यांनी आशादायी माहिती दिली आहे.