भाजप पक्षामध्ये किरीट सोमय्या नाराज असल्याची चर्चा सातत्याने ऐकायला येत आहे. मागच्या काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोग संपर्कप्रमुख पदावर न विचारताच नियुक्ती कशी केली याबाबत सोमय्या यांनी पक्षाकडे विचारणा केल्याचे स्पष्ट झाले होते.
तसेच भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांनी पक्षाकडे पाठवलेली पत्र देखील समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती. आता या सगळ्याच वादावर किरीट सोमय्या यांनी मौन सोडले असून माध्यमांशी बोलताना काही बाबी त्यांनी स्पष्ट केल्या आहेत. किरीट सोमय्या म्हटले आहेत की पक्षाने मला मोठी मोठी काम दिली तर सर्व जबाबदाऱ्या मी अचूकपणे व प्रामाणिकपणे पार पाडल्या आणि अजूनही पाडत आहे. त्यामुळे सोमय्या यांनी सुचवले की मी मोठी मोठी कामे करत आहे. सगळीच कामे मी करतो आहे त्यामुळे मला कमिटी नको. मी जे सुचवलं ते पक्षाला पटलं त्यामुळे पक्षाने त्यात सुधार केला असही माध्यमांशी बोलताना किरीट सोमय्या यांनी स्पष्ट केलं.
कुठल्यातरी विषयावर फडणवीस बावनकुळे व सोमय्या यांचं वेगळं मत असू शकतं. त्याचप्रमाणे या मुद्द्यावर माझ वेगळं मत आहे. गेली पाच साडेपाच वर्ष कुठलेही पद न घेता मी भाजपाचा सामान्य कार्यकर्ता म्हणून प्रामाणिकपणे माझी जबाबदारी पार पाडतो आहे. एवढेच नाही तर 18 फेब्रुवारी 2019 रोजी उद्धव ठाकरे अमित शाह यांच्यासोबतच्या संयुक्त पत्रकार परिषदेत यायला तयार नव्हते, तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी मला पत्रकार परिषदेतून निघून जायला सांगितलं, तेव्हापासून आजपर्यंत मी जीव लावून काम केलय. मला कुठल्याही पदाची गरज नाही हे त्यांना पटलय असं किरीट सोमय्या म्हणाले.
काम पहिल्या इतकाच जोराने व जोमाने सुरू आहे. नाराजीचा विषय नाही. असही किरीट सोमय्या यांनी म्हटल आहे.
तसेच यावी क्रिकेट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर चांगलं तोंड सुख घेतलं. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या कार्यकाळात बहुतांशी विकास प्रकल्पांची कशाप्रकारे वाट लावली हे लवकरच स्पष्ट होईल असेही सोमय्या यांनी म्हटल आहे.
पुढे बोलताना किरीट सोमय्या म्हटले की “मी 2019 मध्ये लोकसभेला, विधानसभेला तितकच काम केलं. सोमय्या भाजपाचा सदस्य आहे.
तर उद्धव ठाकरे यांच्या बद्दल पुढे बोलताना सोमय्या म्हटले की उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात माफियागिरी केली असून बहुतांशी विकास प्रकल्पांची कशाप्रकारे वाट लावली हे लवकरच जनतेसमोर येणार आहे. त्यामुळे खुन्नस काढण्याचा विषय नाही. मी भाजपाचे काम अत्यंत जबाबदारीने व प्रामाणिकपणे चोख पार पाडत आहे. मला कोणत्याही पदाची लालसा किंवा अपेक्षा नाही. येणाऱ्या लोक विधानसभा निवडणुकांमध्ये जनता आमचं काम पाहून आम्हाला निवडून देतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
मात्र प्रसार माध्यमांशी बोलण्यापूर्वी सोमय्या हे नाराज असल्याबाबत व लवकरच भाजपाची साथ सोडणार असल्याबाबतचा चर्चांना मोठ्या प्रमाणात उधाण आलं होतं. अशातच त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना काही बाबी स्पष्ट केल्याने आता पुन्हा काही प्रमाणात या चर्चा थांबल्या आहेत परंतु निवडणुकांच्या पूर्वसंध्येला घडणाऱ्या राजकीय घडामोडी पाहता व उमेदवारांच्या मनात असणारी पक्षांबाबतची नाराजी या सर्वांचा सारासार विचार करता मोठा सत्ता संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.