IMD alert : मिचाँग नावाच्या चक्रीवादळाने तयार झालेलं ढगाळ वातावरण निवळल्याने, उत्तर भारतामध्ये कडाक्याची थंडी जाणवायला लागलेली आहे. राजधानी दिल्ली आणि उत्तर प्रदेश मधील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा देखील घसरलेला आहे. एकीकडे थंडीची चाहूल जाणवत आहे आणि असे असतानाच, दुसरीकडे भारतीय हवामान खात्याने अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे.
हवामान खात्याने जारी केलेल्या या अंदाजाप्रमाणे, केरळ व माहेमध्ये १६ ते १८ डिसेंबर, तामिळनाडू मध्ये १५ ते १७ डिसेंबर तसेच लक्षद्वीपमध्ये १७ व १८ डिसेंबरच्या दरम्यान हलका ते मध्यम प्रमाणात पाऊस पडू शकतो. काही ठिकाणी वादळी वाऱ्यासहीत गारपीटीचा अंदाज सुद्धा वर्तवण्यात आलेला आहे.
सध्या केरळमध्ये ढगाळ वातावरण तयार झालेले आहे आणि येत्या ४८ तासांमध्ये तेथे वादळी वाऱ्यासहीत अवकाळीचा इशारा दिलेला आहे. यांखेरीज लडाख, गिलगिट-बाल्टिस्तान, जम्मू-काश्मीर आणि मुझफ्फराबादमध्ये हलका पाऊस आणि हिमवर्षाव होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. IMD alert
अरुणाचल प्रदेश, लक्षद्वीप, पूर्व आसाम व दक्षिण केरळ येथे हलका पाऊस पडण्याची शक्यता दिलेली आहे. दुसरीकडे दिल्लीमध्ये तापमानाचा पारा घसरल्याने पंजाब तसेच हरियाणा मध्ये दाट धुके पडण्याचा अंदाज देखील वर्तविलेला आहे. उत्तर प्रदेश व त्रिपुराच्या काही भागांमध्ये देखील धुक्यांचा प्रभाव जाणवणार असल्याचे हवामान खात्याने सांगितलेले आहे.
महाराष्ट्रात असे राहणार हवामान:
हवामान खात्याने केरळ राज्याच्या काही भागांमध्ये जोरदार गारपीटीचा अंदाज वर्तवला असल्याने याचा परिणाम महाराष्ट्रा मध्येही होण्याची शक्यता आहे. येणाऱ्या ४८ तासांमध्ये महाराष्ट्रामधील काही जिल्ह्यांत अगदी हलक्या ते मध्यम स्वरुपात पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. उरलेल्या भागात वातावरण हे ढगाळ राहणार असून काही ठिकाणी थंडी आणि हुडहुडी वाढण्याची शक्यता देखील दर्शवलेली आहे.