Take a fresh look at your lifestyle.

संस्थेच्या कारभाऱ्यांत हिंमत नाही का?

‘महाविद्यालयांच्या प्राचार्यांना झालयं तरी | काय..!’ या मथळ्याखाली मागील महिन्यात २४ ऑक्टोबर २०२३ रोजी जिल्ह्यातील नामांकित संस्थांच्या तीन प्राचार्यांच्या काळ्या कर्तृत्वाचा आम्ही पर्दाफाश केला होता. त्यातील दिवंगत मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेने आपल्याच एका महाविद्यालयाच्या प्राचार्यांना घरचा रस्ता दाखविला. त्यांचा पदभार काढून घेतला. विनाविलंब गंभीर कारवाई केली. आता ‘रामा’ची हकालपट्टी झाल्याने दुसऱ्या एका नामांकित संस्थेतील कथित लक्ष्मणावरही कारवाईचा बडगा उगारला जाईल, अशी रास्त अपेक्षा होती. तथापि, ती फोल ठरली. त्यातून संस्थेचे विश्वस्त हिंमत हरवून बसलेत काय ? असा सवाल करण्याची वेळ आली आहे.

प्राचार्यपदावर कार्यरत असताना अहमदनगर जिल्ह्यातील एका नामांकित शिक्षण संस्थेतील ‘रामा’ने आणि दुसऱ्या एका नामांकित संस्थेतील ‘लक्ष्मणा’ने सारखेच रंग उधळले होते. ‘रामा’ने स्वतः चे एका महिलेसोबत असलेले अश्लील फोटो स्वत:च व्हॉटस्अॅप ग्रुपवर व्हायरल केले होते, अन् ‘लक्ष्मणा’नेही आपल्याच महाविद्यालयाच्या काय भक्त वाढत असल्याचे वास्तव चित्रण आहे, अशी भूमिका आम्ही मागील ‘आर पार’मधून मांडली होती. इथे तर दुर्देवाने रंग उधळणारेच राम आणि लक्ष्मण असल्याचे समोर आले. त्यात रामाच्या रंगाचा बेरंग झाला.

तथापि, लक्ष्मण त्यातून सुटलाच कसा, याचे कोडे उलगडले नव्हते. विशेष म्हणजे याचा शिक्षण संस्थेतीलच अनेकांना खेद वाटतो. शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात महाविद्यालयांच्या प्राचार्यांचा खूपच आदब राखला व्हॉस्ॲप ग्रुपवर एका विद्यार्थिनीच्या नावाने अश्लील शेरेबाजी केली होती. त्यावर गहजब उडाला. ‘लक्ष्मणा’ची तक्रार थेट पोलिसांपर्यंत पोचली; मात्र, त्यावर पुढे कारवाई झाली, त्याबाबत आता अनेक महिन्यानंतर थेट राज्य महिला आयोगाने पारनेरच्या पोलिस निरीक्षकांना विचारण केल्याने प्रकरण पुन्हा चव्हाट्यावर आले आहे.

ही चौकशी इतके दिवस कशी पेंडींग राहिली असेल, आर-पार याचे कोडे अगदी शेंबड्या पोरालाही सहज उमगते; मात्र आता त्याबाबतचा चौकशी  अहवालच मागविला असल्याने प्रकरण दाबता येणार नसल्याचे उघड आहे. एका विद्यार्थिनीच्या बाबतीत महाविद्यालयाच्या प्राचार्यांनीच अशी शेरेबाजी करावी अन् त्याच्या चौकशीला एवढा विलंब लागावा, हेच मुळात खूप दुर्देवी अन् मनाला न पटणारी गोष्ट आहे, हे नक्की. कलियुगात श्रीरामाचे कमी अन् रावणाचेच जातो.

त्यांची प्रतिमाच वेगळी असते. प्राचार्य म्हणजे त्या- त्या महाविद्यालयांची खरी शान म्हणावी; मात्र अलिकडच्या अनेक दिवसांपासून महाविद्यालयांची हीच शान अगदीच शेण खात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे, अशी सडेतोड भूमिका आम्ही मांडली. तेच धाडस आम्ही वाचकाश्रयाच्या पाठबळावर यापुढेही करतच राहू; मात्र प्रश्न असा पडतो, की अनेक महाविद्यालयांचे प्राचार्य अलिकडे वादग्रस्त का ठरत आहेत? त्यांना ‘त्या’ प्राचार्यांना सोयरिकीच्या मध्यस्थीची बक्षिसी ! कथित प्राचार्यांनी काळबेरे केलेले कितीही प्रताप उघडकीस आले, तरी त्यांच्यावर कारवाई करण्याचे धाडस संस्थाचालकांमध्ये नाही, अशी भूमिका आम्ही मागील लेखात मांडली होती.

तथापि, त्यातही थोडे अपडेट हाती आले आहे. एका संस्थाचालकाच्या नातलगांच्या सोयरिकीत मध्यस्थाची भूमिका पार पाडल्याने घरातील ही लुडबूड त्या प्राचार्यांना कामी आल्याचे बोलले जाते. त्यातून घरगुती संबंध प्रस्थापित झाल्याने एका संस्थाचालकानेच कथित प्राचार्यांना पाठीशी घातल्याची खमंग चर्चा शिक्षण क्षेत्रात सुरू झाली आहे, त्यातून आता सामान्य माणसाचा संताप अनावर होत आहे.

भविष्यात कधीतरी हा संतापाचा बांध फुटेल, असे भाकीत आम्ही यापूर्वीही केले आहेच. असो. देवा, संस्थाचालकांना सद्बुद्धी दे, असेच केवळ म्हणू शकतो. कारवाई नव्हेच, ही तर बक्षिसी ! विद्यार्थिनीविषयी अश्लील शेरेबाजी केल्याचा वहीम असलेल्या कथित प्राचार्यांची विश्वस्तांनी नुकतीच दुसऱ्या एका महाविद्यालयात बदली केल्याची माहिती सूत्रांनी दिली. तथापि, ही बदली कारवाईच्या नव्हे, तर बक्षिसीच्या स्वरुपात असल्याची लोकभावना आहे.

ज्या महाविद्यालयातून बदली झाली, ते महाविद्यालय तुलनेने कमी दर्जाचे आहे. जिथे बदली झाली आहे. ते महाविद्यालय ए-प्लस दर्जाचे आहे. म्हणजे तुलनेने आणखी चांगले महाविद्यालय देवून त्या प्राचार्यांना अश्लील शेरेबाजी केल्याची बक्षिसी दिली काय, असा सवाल उपस्थित होत आहे. अश्लील शेरेबाजीविषयी जाबच विचारायचा होता तर अगोदर त्या प्राचार्यांना ‘शो कॉज नोटीस’ बजावणे क्रमप्राप्त होते. तोपर्यंत त्यांना सक्तीच्या रजेवर का पाठविले नाही, असाही सवाल शिक्षणक्षेत्रात उपस्थित झाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.