भाजपाचा एक बडा नेता हा राष्ट्रवादीचा वाटेवर असल्याचे बोलले जात आहे. या बड्या नेत्यांनी नुकतीच शरद पवार यांची भेट घेतली व या भेटीनंतर भाजपाचा बडा नेता तुतारी हाती घेणार असल्याबाबतच्या चर्चेला मोठा उधाण आले आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पूर्वसंध्येला मोठ्या प्रमाणात राजकीय घडामोडी घडत असल्याचं चित्र निर्माण झालेलं असताना महायुतीतले अनेक नेते हे शरद पवार यांच्या संपर्कात असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे सत्ताधारी पक्षातील महत्त्वाचे बडे नेते आपल्या पक्षाला डावलून इतर पक्षांमध्ये प्रवेश करणार का? विशेषता भाजपाचे बडे नेते शरद पवारांबरोबर तुतारी हातात घेऊन जाणार का असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
भाजपाचे नेते विवेक कोल्हे यांनी शरद पवारांची भेट घेतल्याची माहिती प्रकाशात आल्यानंतर अशा प्रकारच्या चर्चांना मोठ्या प्रमाणात हवा मिळाली आहे. महायुती सरकार मध्ये विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काही महत्त्वाच्या जागांसाठी वादविवाद निर्माण झाल्याची माहिती खात्रीलायक सूत्राकडून मिळाले आहे कोपरगाव मतदार संघामध्ये देखील जागेवरून वादविवाद रंगत असल्याचे चित्र निर्माण झाला आहे. कोपरगाव मध्ये अजित पवार गटाने आशुतोष काळे यांची उमेदवारी निश्चित केल्यामुळे भाजपाचे विवेक कोल्हे हे शरद पवारांच्या भेटीनंतर शरद पवार गटात जाणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
अशा राजकीय वैयक्तिक भेटीनंतर मोठ्या राजकीय घडामोडी घडत असतात त्यामुळे आता नगरमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पूर्वसंध्येला मोठ्या राजकीय घडामोडी घडवून येणार आहेत तसेच राजकीय भूकंप देखील होण्याच्या शक्यता वर्तवल्या जात आहेत.
असे घडल्यास महायुतीला मोठ्या प्रमाणात धक्का बसण्याचा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. भाजपाचे काही बडे नेते हे भाजपात ना खुश असल्याचे देखील बोलले जात आहे. त्यामुळे त्यांची नाराजी त्यांना दल बदलायला भाग पाडणार का? हे पहा ना आता महत्त्वाचं ठरणार आहे.
महायुतीतील अंतर्गत वाद विवादाचा फायदा इतर पक्षांना होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. नेहमीप्रमाणेच याही निवडणुकीत इच्छुक उमेदवारांना उमेदवारी मिळाली नाही तर उमेदवारी मिळवण्यासाठी प्रत्येक जण आपापल्या परीने निर्णय घेईल अशाही चर्चा रंगू लागल्या आहेत. विशेषतः विरोधी पक्षातील बडे नेते जेव्हा इतर पक्षातील नेत्यांशी भेटीगाठी घेत हितगुज करताना दिसतात तेव्हा अशा प्रकारच्या चर्चांना उधान येत असते.