या अनुदानाकरता शेतकऱ्यांना आधी केवळ ग्रामपंचायतीकडे संपर्क करण्याचा पर्याय दिलेला होता. परंतु आता माहिती तंत्रज्ञान विभागाने ‘प्ले स्टोअर’मध्ये ‘MAHA-EGS Horticulture/Well App’ अॅप्लिकेशन उपलब्ध करून दिलेले आहे. त्यामुळे विहिरीसाठी शेतकरी ऑनलाइन अर्ज दाखल करू शकतो.
१. अॅप्लिकेशनमधून ऑनलाइन अर्ज करावा अथवा ग्रामसेवकाशी संपर्क साधून विहीर अनुदानाची मागणी नोंदवावी.
२. शेतकऱ्याची मागणी ही ग्रामसेवकाकडून तालुका पंचायत समितीत कळवली जाते.
३. प्रत्येक ग्रामपंचायतीतील ग्रामरोजगार सेवक आणि ग्रामसेवकांकडून विहीरीच्या प्रस्तावांचा पाठपुरावा केला जातो.
४. खोदाई कार्यारंभ आदेश मिळविण्यासाठी शेतकरी आपला सातबारा, जॉबकार्ड, आठ-अ थेट अपलोड किंवा ग्रामपंचायतीत जमा करू शकतात.
५. विहिरीच्या नियोजित जागेची ‘अ’ लघू पाटबंधारे विभागाचा शाखा अभियंता अथवा उपअभियंत्याकडून पाहणी होते आणि तांत्रिक मान्यता दिली जाते.
६. नंतर पंचायत समितीचा गटविकास अधिकारी या प्रस्तावाला मान्यता देतो. त्यानंतर विहीर खोदाईचा आदेश मिळतो.
७. कार्यारंभाचा आदेश मिळण्यापूर्वी विहीर खोदू नये, अनुदानाच्या नामंजूची शक्यता देखील असते.